मराठी कवी कादंबरीकार समीक्षक श्रीधर तिळवे ह्यांनी सौष्ठव ह्या अनियतकालिकात त्यांच्या २५ कविता एकत्रित छापून व त्यांच्या कवितेवर विस्तृत समीक्षा लिहून त्यांची ओळख मराठी साहित्यक्षेत्रात चौथ्या नवतेचा कवी म्हणून करून दिली 

An eminent Marathi Writer and critique intoduced him 


स्टीव्ह जॉब्स माहित नाही असा ह्या चिन्हसृष्टीत कोण आहे ?माझ्या आदराची जगातील जी काही मोजकी आदराची तीर्थक्षेत्रे आहेत त्यात एक अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे स्टीव्ह जॉब्स ज्यांना सर्वार्थाने चौथ्या नवतेची म्हणावीत अशा माणसांपैकी एक ! साहजिकच सौष्ठवाच्या मुखपृष्ठावर जॉब्सचे काहीतरी यावे अशी माझी मनोमन इच्छा होती शेवटी ह्या अंकासाठी मला त्याचे तसे क्वोट सापडले आणि मी ते मुखपृष्ठ म्हणून छापले .  हे त्याचे कथन म्हणजे चौथ्या नवतेच्या ऍटिट्यूडचे सार आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टीव्ह जॉब्सवर जेव्हा चरित्रात्मक चित्रपट आला तेव्हा त्या चित्रपटाचा शेवटही ह्याच क्वोटने झाला मुखपृष्ठ पुढीलप्रमाणे 

मराठी वाचनसंस्कृती श्रीधर तिळवे (गणेश कनाटे ह्यांच्या पोस्टवर कॉमेंट  )

पहिला अक्ष संस्कृतीच्या चार म्हणजे मार्गी देशी पोटी आणि जमाती अंगाचा सर्वात पहिली गोष्ट मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल वाचनसंस्कृतीत पूर्ण ढळला आहे कुठल्याही वाचन संस्कृतीत मार्गी वाचन फक्त २० टक्के हवं आणि देशी ५० टक्के किमान १५ टक्के पोटी व १५ टक्के जमाती हवं पण मराठीत मार्गी म्हणजे हिंदी व इंग्लिश वाचन हे स्टेट्स आहे मराठी वाचन बिलो स्टेट्स आहे मग नेमाडे म्हणतात तसं तुकाराम वाचला नाही तर चालेल पण शेक्सपियर वाचला पाहिजे ही वृत्ती बळकावले चेतन भगत वाचणे म्हणजे प्रेस्टिज कमवणे पिंजरापेक्षा  शोलेचीच (तो पिंजरापेक्षा निर्विवाद टेक्निकल पातळीवर उजवा आहे ) चर्चा करणे हे घडते 

ह्यात पुन्हा दुसरा अक्ष नवता व जूनता ह्यांचा आहे मराठी वाचक जो इंग्रजी वाचनाबाबत नवताप्रोन असतो मराठीत वाचताना जूनताप्रोन असतो वाचनाबाबत शिळी भाकरी खाण्यात मराठी लोकांना मजा येते वास्तविक आता महाराष्ट्रात काय चाललंय हे कळणं खूप आवश्यक असतं आणि ते कळण्याचा उत्तम मार्ग नवतावादी वाङ्मय वाचणे हाच असतो विशेषतः कविता पण मराठी लोकांना इतिहासात आपण काय करत होतो आपले राजे काय करत होते ह्यातच रस आपल्या आयुष्याचं काय चाललंय ह्यात काडीचाही रस नाही मला संशय आहे आधुनिकता ही मराठीवर आणिबाणीसारखी लादलेली गोष्ट आहे त्यामुळे तिची खिल्ली उडवणारे पु ल टाईप लिखाण मराठी वाचकाला आवडते 

तिसरा अक्ष सिलॅबस तिथे सतत नवतावादी वाङ्मय पोचवणे त्यांचा सिलॅब्समध्ये समावेश करणे आणि मुख्य म्हणजे तिथे नवता उत्तम शिकवणे मराठी शिकवणाऱ्या बहुतेक शिक्षकांची व प्राध्यापकांची लायकी संशयास्पद आहे हे लोक स्वतःच इतके रोमँटिक असतात कि त्यांना रोमँटिसिझम हा १८ व्या शतकातला जुनाट इझम आहे हे माहीत नसते हे अनेकदा गुलझारचे फॅन असतात आणि गुले गुलजार असतात मग मृत्युंजय ही मराठीतील रोमँटिक कादंबरी डॉमिनेट करणे अटळच असते हे म्हणजे २१ व्या शतकात सायकलने प्रवास करणे असते पण ह्यांना हे कोण समजवणार ? सहिष्णुतेच्या नावाने ह्यांना कितीकाळ बरदाश्त करायचे कितीकाळ सहन करायचे झेलायचे हाच प्रश्न पडायला लागलाय बरं निदान त्यात तरी ऍडव्हान्स ? ग्रेस हा गुलजारपेक्षा थोर कवी आहे हे ह्यांना पटवायचं कसं ?

ह्यावर उपाय काय ? सतत नवता हॅमर करणे मी २० व्या शतकाच्या शेवटी सौष्ठवमध्ये मराठीतल्या उत्तम पुस्तकांची लिस्ट दिली होती आणि त्यात जाणीवपूर्वक साठोत्तरी व नव्वदोत्तरी लेखकांची पुस्तकनावे टाकली होती म्हणजे त्यात मन्या जोशी , ज्ञानदा , सलील वाघ ह्यांचीही त्यावेळी नावे होती 

दुसरी गोष्ट प्रथम मराठी लेखकांनी आंतरराष्ट्रीय लेखकांचा गलबला कमी केला पाहिजे आणि मराठी वाचणाऱ्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे लेखक स्वतःच हे करत नाहीत बुकर प्राईझ नोबल प्राईझ ह्यांचा गवगवा किती करावा ह्याला काही मर्यादा ?दिलीप चित्रे थोर का तर ते परदेशात कविता वाचतात आता ही काय साहित्याच्या थोरवीची कसोटी असत नाही 

तिसरी गोष्ट मराठीत उत्तम मनोरंजन करणारं लिखाण खूप वाढलं पाहिजे भारतीय इंग्रजीत चेतन भगतपासून शोभा डे पर्यंत सतत उत्तम कमर्शियल लिखाण होते आहे परिणामी सलमान रश्दी , अमिताव घोष पण वाचले जातायत मराठीत श्रीकांत सिनकर , नारायण धारप ,सुहास शिरवळकरमुळे कमर्शियल लिखाणाचा उत्तम दर्जा सेट झाला होता आज संजय सोनवणी सोडले तर असे कोण आहेत ? अलीकडे मराठीत काहींनी कमर्शियल उत्कंठावर्धक कादंबऱ्या लिहिलेत पण त्यांची चर्चा अभिजात म्हणून केली गेली त्याने मराठीचे नुकसान झाले पॉप्युलॅरीटी हवे असणारे हे लोक आहेत पण ह्यांना अभिजात परंपरेतही बसायचं आहे दोन्हीकडून ऊस खाण्याची ही तऱ्हा मराठी वाचनसंस्कृतीला कमालीची घातक ठरली आहे 

एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे अभिजात संगीताप्रमाणे अभिजात वाचनही शिकवावे लागते आणि त्याची सुरवात घरापासून व्हावी लागते स्वतःची पोरं इंग्लिश माध्यमात टाकणारे दांभिक मराठी लेखक व प्राध्यापक हे काय करणार ? खरंतर मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना व प्राध्यापकांना त्यांची मुले मराठीत टाकण्याची सक्ती करावी काय असाही मुद्दा माझ्या डोक्यात अनेक दशके वळवळत असतो घरात इंग्लिश मिडीयम चालवणाऱ्या शिक्षकाला प्राध्यापकाला व लेखकाला पाहून मराठी वाचायला कोण विद्यार्थी तयार होणार ? ह्यांची स्वतःची मुलं तरी ह्यांचं लिखाण वाचतात काय ? एकीकडे रोमँटिक लिहणाऱ्या दुसरीकडे गुले गुलजार होणाऱ्या व तिसरीकडे आपल्या पोरांना इंग्लिश माध्यमात टाकणाऱ्या लोकांची मानसिकता नेमक्या काय लायकीची असते ? आणि त्यांच्यामुळे मराठी वाचनसंस्कृतीचे काय भले होणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक 










Comments